Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jan 31, 2012

गाय,वाघ आणि स्त्री


गाय,वाघ आणि स्त्री

                     मुंबईच्या अभिव्यक्ती ग्रंथ न्यास या संस्थेतर्फे नुकताच "गझल : सुरेश भटानंतर" हा गझलेचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अभिव्यक्ती ग्रंथ न्यास ही समग्र मराठी गझलेच्या उत्कर्षासाठी झटणारी जनमान्यता पावलेली संस्था. कविवर्य स्व. सुरेश भटानंतर जे गझलकार झालेत त्यांच्या निवडक गझलांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला असून या ग्रंथात माझ्या तीन गझलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला  आहे. मी गझल लिहायला लागल्यापासून आजपर्यंत काही दिग्गज गझलकारांनी मी गझलेमध्ये जसा आशय व्यक्त करतो, तो गझलियतशी मेळ खात नाही, असे म्हणून माझ्या गझलेला कमी लेखण्याचा जो प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर माझ्या गझलांचा या संग्रहात समावेश झाल्याने माझ्या गझलेतील ग्रामीण आशयाला या निमित्ताने जनमान्यतेची अधिकृत पावतीच मिळाली आहे.

                     दोन वर्षापूर्वी मराठी गझल या काव्यप्रकाराशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. कवितेपेक्षा गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे भिन्न असतो. लयबद्धता हा गझलेचा प्राण असतो. तंत्रशुद्धतेच्या चौकटी काटेकोरपणे सांभाळूनच गझल जन्माला येते. मुक्तछंद किंवा छंदमुक्ततेला गझलेत काहीही स्थान नसते. वेगवेगळ्या तर्‍हेचे पाचपेक्षा जास्त विषय एकाच रचनेत प्रभावीपणे हाताळण्यासाठी गझलेसारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. ह्या गोष्टी माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेल्यात की मला गझल या काव्यप्रकाराचे अक्षरशः वेड लागले आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.

                     गझल लिहिणे हे थोडे कलाकुसरीचेच काम असते. काव्य स्फुरले तर कविता लिहिली जाऊ शकते, गझल लिहिली जाऊ शकत नाही. गझल हा तसा कृत्रिमरीत्या काव्य हाताळण्याचा प्रकार आहे. स्फ़ूर्तीमुळे एखाद्या लयबद्ध शेराची किंवा मतल्याची निर्मिती होऊ शकेल; पण उर्वरित चार किंवा त्यापेक्षा जास्त शेर मात्र मतल्यात निश्चित झालेल्या जमिनीला म्हणजे बहर (वृत्त), काफ़िया (यमक)  आणि रदीफ (अंत्ययमक) अनुसरून जाणीवपूर्वकच रचावे लागतात. मी तसा गझलेचा अभ्यासक किंवा फारसा वाचकही नाही; पण ज्या काही गझला माझ्या वाचण्यात आल्या त्यात ग्रामीण सुखदु:खाचे पदर असलेली गझल मला आढळलीच नाही. शेती आणि शेतकरी या शब्दांचा गझलेशी दूरान्वयानेही संबंध मला तेव्हाही आढळला नाही, आजही आढळत नाही. अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दू भाषेत दाखल झालेला हा काव्यप्रकार आता सर्वच भारतीय भाषांत दाखल होऊ पाहत आहे. मराठी भाषेतही गझल हा काव्यप्रकार बर्‍यापैकी रुजलेला आहे. सर्वसाधारणपणे "शराब आणि शबाब" याविषयाभोवतीच पिंगा घालणार्‍या पारंपरिक गझलेला मराठी गझलेने फाटा देऊन सामाजिक आशयाची झालर दिली असली तरीसुद्धा विशिष्ट साचेबंद आशयाच्या बाहेर पडून मराठी मातीचा सुगंध पुलकित करण्यार्‍या आशयाकडे झेप घ्यायची उत्कंठा मराठी गझलेत अजूनही जागृत झाल्याचे जाणवत नाही. ज्या देशातला बहुसंख्य समाज अनादीकाळापासून शेती याच एकमेव व्यवसायावर गुजराण करीत असला आणि स्वतः अर्धापोटी राहून इतरांना पोटभर जेवू घालत असला तरी शेतीक्षेत्राचे वास्तववादी चित्र प्रतिबिंबित करण्यात जिथे संपूर्ण साहित्यक्षेत्रानेच शेतीक्षेत्राची उपेक्षा केली तिथे नवख्या मराठी गझलेला दोष देण्यात अर्थ नसला तरी या दिशेने पाऊल टाकण्याचे प्रयत्न न होणे, ही मात्र साहित्यक्षेत्राला फारशी शोभादायक बाब खचितच नाही. गझलेला शेतीच्या बांधवर आणून सोडायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी गझलकार पुढाकार घेईल याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपणच गझल लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? अशी माझी भावना झाली आणि मी गझल लिहायचे ठरवले.


                     मी गझल लिहायचे ठरविले तेव्हा तंत्रशुद्धता आत्मसात करणे ही अभ्यासाने साध्य करण्यासारखी बाब आहे, याची मला जाणीव होती. मुख्य प्रश्न होता आशयाचा. आलंकारिक भाषेत शारीरिक प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गझल लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. तरुण, तरुणी, प्रेमरस, प्रेमभंग किंवा तिचा गजरा, तिच्या नजरा, तिचे चालणे, नटकणे, लचकणे, गालात खळी पडणे या विषयावर एवढ्या गझला लिहिल्या गेल्या आहेत की मी आणखी पुन्हा याच विषयावर गझल लिहावी असे मला वाटत नाही. आधीच कुण्यातरी गझलकाराने लिहिलेल्या ओळींची मोडतोड करून किंवा शब्दांची अदलाबदल करून शेर किंवा गझल रचायची आणि ती आपल्या नावावर खपविण्यासाठी लागणार्‍या वृत्तीची माझ्याकडे वानवा आहे. शिवाय शेती आणि ग्रामीण जीवन हाताळता येत नसेल तर गझल लिहायची हौस तरी कशासाठी बाळगायची? हा मला पडलेला प्रश्न.


                     
गझलेतील लयबद्धता, वृत्ताची हाताळणी, यमकाचे नादमाधुर्य आणि एकाच गझलेत पाचपेक्षा जास्त वेगवेगळे विषय हाताळायची संधी, हे गझलेने मला वेड लावण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे गझल लिहिण्याचा मोह काही केल्या टाळताही येईना. शेवटी ठरले की आपण जे काही लिहायचे, ते शेतीविषयाला अनुसरूनच लिहायचे. गझलेतील आशयाच्या प्रांतात सुद्धा चिरयौवणी ललनेचे मोहक डोळे किंवा शरीरसौंदर्य प्रकटीत करणार्‍या अवयवाऐवजी आपल्याच शेतातील वांगे, टमाटर, आंबे, चिक्कू, पेरू, गाय, बैल, वासरू इत्यादींना सोबत घेऊन गझलप्रातांत शिरायचे. निर्णय झाला आणि लेखनी उचलली. पहिल्याच प्रयत्नात थोडीशी सूट घेतलेली आनंदकंद या वृत्तातील माझी पहिलीवहिली गझल आकारास आली.... 

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.


                     ही गझल सहा संकेतस्थळावर प्रकाशित केल्यावर रसिकाकडून जोरदार स्वागत झाले. पहिलीच गझलरचना असल्याने कौतुकही झाले पण; दबक्या आवाजात का होईना, भाषाशुद्धता व तंत्रशुद्धतेतील दोन निकष पाळले गेले नसल्याची खंतही व्यक्त झाली. देण्या ऐवजी देण्यास आणि जोजविण्या ऐवजी जोजविण्यास असे असायला हवे होते आणि तसे केले तर वृत्त बिघडणार होते. दुसरा मुख्य नियम असा की, मतल्याच्या किंवा शेराच्या पहिल्या ओळीत विषयाची प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीत जी प्रस्तावना व्यक्त झाली असेल तिचा प्रभावी समारोप असायला हवा. शेरातील दोन ओळींचा परस्पर संबंध असायलाच हवा. त्यामुळे 


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.


                     हा मतला डोक्यावरून डोक्यावरून गेल्याच्या किंवा काहीही अर्थच लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभूमी उलगडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मते त्या मतल्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.


बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारीरिक अंगाने अबलाच. स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, उंदराला बिळात घुसता येते, मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते, कुत्र्याला भिंतीवर चढता येत नाही.
या झाल्या उंदीर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करून कौशल्याने अन्न मिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघूयात.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रूपेक्षा अधिक वेगवान वेगाने पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरीत्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे निसर्गत: यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करून साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करून संपूर्ण सजीव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही. विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढू शकत नाही. साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करू शकेल.
पण गायीचे काय? गाय पूर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा. (कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या?)
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणार. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभावच.
गायीवरचे प्रेम, भूतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये वगैरे ठिकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दूध काढताना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल? गायीचे काय होईल?
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दूध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु. प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दूध खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या किती?
जर अशी स्थिती उद्भवली आणि दुधाचा धंदा न परवडणारा झाला तर कोणी कशाला गायी पाळतील? मग अशा विपरीत परिस्थितीत माणूस गायीचा त्याग करणारच.
मग गायीचे काय होईल? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करू शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत, ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत, ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे, ना हत्तीसारखे शक्तिशाली सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षीण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल?
तेव्हा तिला तिच्या संरक्षणार्थ गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण?
गायीला जेवढे नैसर्गिक शत्रू आहेत त्या सर्वांना पराभूत करून गायीला जीवदान, अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह, वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करू शकत नाही.
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच.
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भूक शमविण्याची वस्तू या नजरेने पाहणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल, अभय देऊ शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कुठे?
ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणून गाय आणि स्त्री या दोघीत याच अनुषंगाने विचार केला तर दोघींच्याही व्यथा सारख्याच वाटतात मला.

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”

                                                                                                                            - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------

Jan 21, 2012

शेतकरी संघटक - २१ जानेवारी २०१२

शेतकरी संघटक - २१ जानेवारी २०१२

अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.

  issue

अंतरंग

जागरण

कापसाचा एल्गार            .......................३ 
गंगाधर मुटे
 --------------------------------------------------------

आजकाल

कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे
ज्ञानेश्वर शेलार 5..................५
--------------------------------------------------------
मुद्दा
शेतमाल बाजार : संप, कंप व दंभ !
गिरधर पाटील 7 ...................७
 --------------------------------------------------------

विचार

खरे लोकप्रतिनिधी मिळणार केव्हा? नव्या जगाला सामोरे जाणार्‍या युवक, युवतींनो    
अमर हबीब 8.........................८
 --------------------------------------------------------

कॉमन नॉन सेन्स

दुराग्रहात फसलेला लोकपाल आणि टीमअण्णाचा गाडा संघाने केला अण्णा संघ गारद
सुधाकर जाधव 10.......................१०
 --------------------------------------------------------

मिरचीचं खळं

जय हो पाध्ये
बाबू सोंगाड्या 15 .........................१५ 
//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.

//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

Jan 6, 2012

शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२

पीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.मुखपृष्ठ

पाक्षिक शेतकरी संघटक

वर्ष २८ ! अंक १९ ! ६ जानेवारी २०१२

अंतरंग


वृत्तांत
मा. शरद जोशी यांना ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
गंगाधर मुटे ...........२
..............................................................................
मानवंदना
(मा. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्रावरील मजकूर) ६
.............................................................................
आजकाल
तुमची स्वप्ने आमची माती
ज्ञानेश्वर शेलार ...........८
.............................................................................
कॉमन नॉन सेन्स
लोकपाल नव्हे अण्णापाल
सुधाकर जाधव ...........१०
.............................................................................
मुद्दा
उदंड जाहली पॅकेजेस
गिरधर पाटील ...........१३

.............................................................................
विचार
विकासाची नवी दृष्टी स्वीकारणार केव्हा?
अमर हबीब ...........१४
.............................................................................
शेतकरी संघटना वृत्त ...........१५
////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
क्लिक करा आणि अंक वाचा.
पाने पलटण्यासाठी पानाच्या कीनारीवर/ काठावर क्लिक करा म्हणजे पाने पलटतील.
तुमचे नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी प्रतिक्षा करा.


शेतकरी संघटकचे यापुर्वीचे अंक - येथे वाचा
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

पीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं