Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Nov 30, 2011

शेतकर्‍यांची समांतर विधानसभा


shetkari
प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, धरणे, निदर्शने यासारख्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाने शासनावर काहीच परिणाम झाला नाही म्हणून आता संघटनेने १० आणि ११ डिसेंबरला ‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’ नागपुरात रामनगर मैदान, रामनगर येथे आयोजित केली आहे. ही माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी आज पत्रपरिषदेत दिली. 

                 चटप यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत मागील वर्षी कापसाला चांगला भाव असतानासुद्धा शासनाने प्रथम ५५ लाख व नंतर १० लाख गाठी एवढ्या मर्यादित प्रमाणातच निर्यातीला परवानगी दिली. त्यावेळी शेतकर्‍यांना ६ ते ७ हजार रुपये भाव मिळाला होता व नंतर एकदम ३ हजारावर आला. सुरुवातीलाच निर्यात खुली राहिली असती तर शेतकर्‍यांना ७ हजार रुपये भाव मिळाला असता. यावर्षी जागतिक बाजारपेठेत मंदी आहे व शासनाने अजूनपर्यंत निर्यात खुली केलेली नाही. महाराष्ट्र शासनानेसुद्धा कापसाला ३३०० रुपये एवढाच भाव जाहीर केला आहे. दुसरीकडे बाजारपेठेत चांगले भाव असतील तेव्हा निर्यातबंदी व कमी असेल तेव्हा शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून देण्याचे केंद्राचे धोरण. अशा दुहेरी मारामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.

                     ‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभे’च्या दोन दिवसांच्या कामकाजात बिगर बासमती तांदूळ व डाळीवरील निर्यातबंदी उठविणे, कापसाला प्रती क्विंटल ६ हजार रुपये, धानाला २६०० रुपये, सोयाबीनला ३ हजार, तर तुरीला ५ हजार रुपये एवढी किंमत द्यावी, संपूर्ण शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिलातून मुक्ती, पूर्ण दाबाची व पूर्ण वेळ वीज देण्यात यावी या विषयांसह शेतकर्‍यांच्या अन्य जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवरही चर्चा करण्यात येणार आहे. 

                     शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा विधानसभा किंवा लोकसभेत पाहिजे त्या पोटतिडकीने आवाज उठवित नाही. त्यामुळेच आपले प्रश्‍न आपणच सोडविले पाहिजे, या विचारानेच या अभिनव आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत विविध विषयांवरील चर्चेसोबतच ठरावांसह पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. कापूस, धान, तूर, सोयाबीन व अन्य पीक उत्पादक शेतकर्‍यांनी ‘शेतकर्‍यांच्या समांतर विधानसभे’ला उपस्थित राहावे, असे आवाहनही वामनराव चटप यांनी केले.

                        पत्रपरिषदेला सरोजताई काशीकर, राम नेवले, अरुण केदार, गंगाधर मुटे, मधुसूदन हरणे, घनश्याम पुरोहित, उमेश निनावे उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------
अधिक वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Nov 27, 2011

कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली

कापूसप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत
शेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल

                    कापसाच्या वाढीव हमी भावाच्या मुद्यावरून पेटलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सरकारच्यावतिने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेसह उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी-पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी मंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक, विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड उपस्थित होते.

                       कापूस उत्पादक आंदोलनकर्त्यांच्यावतिने शेतकरी संघटनेतर्फ़े कैलास तवार व गंगाधर मुटे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, आमदार रवी राणा, समग्र विकास आघाडीचे प्रकाश पोहरे उपस्थित होते.

                      शेतकरी संघटनेचे कैलास तवार म्हणाले की, एकीकडे कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक गुल्हाटी कबूल करतात की महाराष्ट्रात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडे मात्र कापसाचा उत्पादन खर्च वाढूनही कापसाला भाव द्यायला चालढकल करते. केंद्र सरकारने हातमाग उद्योगाला मदत केली, उद्या कापड उद्योगाला करेल पण नेमके कापूस उत्पादकाकडेच का दुर्लक्ष केले जाते? मुळाला चांगले पाणी न देता चांगल्या फ़ळाची अपेक्षा कशी करता? माझा स्वत:चा दहा हेक्टर कापूस आहे, आतापर्यंत खर्च झाला आहे एक लक्ष अंशी हजार रुपये आणि उत्पादन येईल बारा क्विंटल. आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत येईल पन्नास हजार रुपये. मग मी एक लक्ष वीस हजार रुपयाचा तोटा कसा भरून काढायचा? मी कापूस पिकवला यात काय गुन्हा केला? आम्ही पुर्वीपासून उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भावाची मागणी केली आहे. कापसाला सहा हजार, सोयाबीनला तीन हजार, धानाला एक हजार सहाशे आणि तुरीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे, अशी तवार यांनी जोरदार मागणी केली.

                     शेतकरी संघटनेचे गंगाधर मुटे म्हणाले की, कापसाचे उत्पादन घेण्यासाठी लागणार्‍या निविष्ठांचे भाव दिड-दुपटीने वाढले आहेत. मजुरीचे दर, शेतीऔजार बनविण्यासाठी लागणारा लाकुडफ़ाटा, दोरदोरखंड, वखरफ़ास यांचेही भाव वाढले आहेत मात्र गेल्यावर्षी सात हजार रुपये प्रति क्विंटल असणारे भाव यावर्षी चार हजार रुपयावर घसरले आहेत. शेतमालाचा उत्पादनखर्च काढण्याची पद्धत सदोष असल्याने आणि शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती सरकारकडे नसल्यानेच कापूस उत्पादकांची ससेहोलपट होत असून त्यांना नाईलाजाने आत्महत्या कराव्या लागत आहे. कापसाला यंदा सहा हजार रुपये भाव मिळाला नाही तर कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्त्यांत वाढ होण्याची शक्यता आहे. 

                    शेतमालाचा उत्पादनखर्च काढताना सदोष कार्यपद्धती आणि चुकीची आकडेवारी वापरून सरकार दुहेरी बदमाशी करत असल्याचा आरोप करून कृषि मुल्य आयोग ज्या सदोष पद्धतीने कापसाचा उत्पादन खर्च काढते, त्याच तक्त्यात जर वस्तुनिष्ठ आकडे घातले तरी कापसाचा उत्पादन खर्च ७९६६/- रु. प्रति क्विंटल एवढा निघतो. कापसाच्या उत्पादन खर्चाच्या बाबतीत शासनासोबत जाहीर चर्चा करण्याची तयारी असून सरकारने आव्हान स्विकारावे, असेही मुटे म्हणाले आणि शेतकरी संघटनेने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या तपशिलवार गोषवार्‍याच्या प्रती मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कृषी-पणन मंत्री, रोजगार हमी मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पर्यावरण मंत्री, वित्तराज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना सादर केल्या. कापसाचा वास्तविक उत्पादनखर्च प्रति क्विंटल ७९६६/- पेक्षाही जास्त निघत असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभाव आणि महाराष्ट्र शासनाची आर्थिक कुवत लक्षात घेऊनच शेतकरी संघटनेने प्रति क्विंटल ६०००/- रु. ची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेची कापसाला ६०००/- रु. भाव द्या, ही मागणी  जास्त नसून रास्त व व्यवहार्य आहे, याकडे मुटे यांनी शासनाचे लक्ष वेधले.

                    फ़ेब्रुवारी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी असताना शासनाने निर्यातबंदी जाहीर केली त्यामुळे कापसाचे भाव सात हजार रुपयावरून तीन हजार रुपयावर घसरले आणि कापूस उत्पादकांचे नुकसान केले. तेजी असेल तेव्हा कापसावर निर्यातबंदी लावायची आणि मंदी असेल तेव्हा कापूस उत्पादकांना वार्‍यावर सोडून द्यायचे ही सरकारची शेतकरीविरोधी नीती यापुढे शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. कापसाला किमान ६०००/- रु. भाव मिळण्याची व्यवस्था करणे ही महाराष्ट्र सरकारची नैतिक जबाबदारी असून आता कोणत्याही स्थितीत विदर्भ-मराठवाड्यातला कापूस उत्पादक शेतकरी कापसाला प्रति क्विंटल ६०००/- भाव मिळवल्याखेरीज शांत बसणार नाही, बर्‍या बोलाने सरकार ऐकणार नसेल तर शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला शेतकरीविरोधी भुमिका बदलण्यास भाग पाडेल, असा खणखणित इशारा शेतकरी संघटना प्रतिनिधिंनी दिला.

                    प्रहार संघटनेचे बच्चू कडू म्हणाले की, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावेत म्हणून ३० वर्षापासून लढा देत आहे पण सरकार लक्ष देत नाही. ही अन्यायकारक बाब असून कापसाला सहा हजार आणि सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे गरजेचे आहे.

                    प्रकाश पोहरे यांनी बहुतांश वेळ आत्मस्तुतीचे पोवाडे गाण्यातच खर्ची घातला. पोहरे म्हणाले की मी गेली अनेकवर्षे शेतकरी समाजासाठी काम करतो आहे. मी शेतकरी संघटनेतही बरीच वर्षे काम केले आहे. मी शेती विषयावर लेख लिहित असतो. मुख्यमंत्री साहेब ते तुम्ही वाचतच असता. मी एक आवाज दिला की हजारो लोक रस्त्यावर उतरतात. लोक माझे कट-आऊटस हातात घेऊन आंदोलने करतात, वगैरे वगैरे. आत्मस्तुती करण्याच्या नादात कापसाच्या भावाचा मुद्दा बाजुला पडत आहे हे बघून इतर प्रतिनिधींनी अहो, मुद्याचं बोला-कापसाच्या भावाविषयी बोला असा आग्रह केला तेव्हा सोन्याचे भाव सतत वाढत आहे म्हणून कापसाचेही भाव वाढून कापसालाही पाच हजार रुपये भाव मिळाले पाहिजेत, अशा तर्‍हेचा घासूनपुसून गुळगुळीत झालेला मुद्दा त्यांनी मांडला आणि अ‍ॅग्रोवनमध्ये प्रकाशित झालेला तुलनात्मक तक्ता वाचून दाखवला.

                उपोषणफ़ेम आमदार रवी राणा कापसाच्या प्रश्नावर फ़ारसे बोललेच नाहीत. ते म्हणाले उपोषणामुळे माझी प्रकृती खूप खालावली होती. किडनीवर कशी सूज आली होती आणि त्यांना किती सलाईन लावाव्या लागल्या हे त्यांनी तपशिलवारपणे कथन केले. सरकारला पाठींबा दिला असूनही उपोषणकाळात मुख्यमंत्र्यांनी त्यांची फ़ारशी दखल न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.


                                                                                         - शेतकरी संघटक प्रतिनिधी
----------------------------------------------------------------------------------------------------
                  शेतकरी प्रतिनिधी सोबत चर्चा केल्यानंतर  मंत्रीमंडळाची बैठक झाली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कापूस-धान-सोयाबिन उत्पादकांना प्रति क्विंटल ऐवजी प्रति हेक्टरी मदत देण्यात येईल, असे जाहीर केले पण आचार संहिता असल्याने प्रति हेक्टरी किती मदत करणार ते मात्र जाहीर केले नाही.

                यासंबंधात IBN-Lokmat आणि Star majha या वृत्तवाहिन्यांनी शेतकरी प्रतिनिधी कैलास तवार व गंगाधर मुटे यांच्या Live मुलाखती प्रसारीत केल्या.
--------------------------------------------------------------------------------------------------------


Nov 26, 2011

शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०११

cover

वर्ष 28 । अंक 16 । 21 नोव्हेंबर 2011

अंतरंग

जागरण
शिक्षणाची शाळा
श्रीकृष्ण उमरीकर 3
--------------------------------------------------
आजकाल
आता कापूसही पेटणार?
ज्ञानेश्वर शेलार 6
--------------------------------------------------
स्वातंत्र्य
हे काय चालले आहे?
विनय हर्डीकर 8
--------------------------------------------------
चर्चा
मुख्यमंत्र्यांचा अव्यापारेषु व्यापार
गिरधर पाटील 11
--------------------------------------------------
मुलाखत
सौ. जयश्री पाटील
मुलाखतकार- ज्ञानेश्वर शेलार 13
--------------------------------------------------
कॉमन नॉन सेन्स
शेतकरी आंदोलनाची पुनर्मांडणी
सुधाकर जाधव 16
--------------------------------------------------
वाङ्‌मय शेती
गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेतीव्यवसायातच
गंगाधर मुटे 19
--------------------------------------------------
मिरचीचे खळे
सारे मिळूनी करू भकास
बाबू सोंगाड्या 22
--------------------------------------------------
अभिजात वाङ्‌मय
गोदान
मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद, अनु. अनंत उमरीकर 24
--------------------------------------------------
शेतकरी संघटना वृत्त 27
--------------------------------------------------
अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
--------------------------------------------------

Nov 20, 2011

वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन

वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन

शेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.

                     आज दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान वायगाव चौरस्ता (जि. वर्धा) येथे हजारो शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष माजी आमदार सरोज काशीकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली वायगाव चौरस्त्यावर वाहतुक अडवून १ तास वाहतुक रोखून धरली. 
                   कापसाची सहा हजार रुपये, सोयाबिनची तीन हजार रुपये, तुरीची पाच हजार रुपये आणि धानाची एक हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत जाहीर करावी, थकित वीजबिलापोटी शेतातील विजपुरवठा खंडीत करणे थांबवावे, कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा, बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी, संपूर्ण शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे, आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्‍यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी इत्यादी प्रश्नाची कायमची सोडवणूक करून घेण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी एक तासाचे लाक्षणिक स्वरुपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 
रस्ता रोको शेतकरी किसान Farmer
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Nov 18, 2011

कापसाचा उत्पादन खर्च.


 
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.  

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकर कापूस पिकाचा खालील प्रमाणे:

अ] भांडवली खर्च :

१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती :      २०,०००.००
२) बैल जोडी :                                ८०,०००.००
३) बैलांसाठी गोठा :                     १,००,०००.००
४) साठवणूक शेड :                     १,००,०००.००
-----------------------------------------------
अ] एकूण भांडवली खर्च :           ३,००,०००.००   
-----------------------------------------------

ब] चालू खर्च (खेळता भांडवली खर्च)

१) शेण खत :                                               १,२०,००० रु
२) नांगरट करणे :                                             ८,००० रु
३) ढेकळे फ़ोडणे, सपाटीकरण :                          ४,००० रु.
४) काडीकचरा वेचणे :                                        ८,००० रु.
५) बियाणे :                                                     १८,६०० रु.
६) लागवड खर्च :                                               ८,००० रु.
७) खांडण्या भरणे :                                            २,००० रु.
८) निंदणी/खुरपणी खर्च (दोन वेळा) :                १५,००० रु.
९) रासायणीक खत मात्रा                                 २४,००० रु.
१०) रासायणीक खत मात्रा-मजूरी खर्च :             ८,००० रु.
११) सुक्ष्म अन्नद्रव्य :                                       ७,००० रु.
१२) किटकनाशके :                                         ३०,००० रु.
१३) फ़वारणी मजूरी :                                        ६,००० रु.
१४) कापूस वेचणी (६० क्विंटल) :                     ५२,००० रु.
१५) वाहतूक/विक्री खर्च :                                   ५,००० रु.
१६) बैलाची ढेप/पेंड :                                         ३,००० रु.
१७) बांधबंदिस्ती/सपाटीकरण खर्च :                २०,००० रु.
------------------------------------------------------------
ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                  ३,३८,०००.००
------------------------------------------------------------
.
१) भांडवली खर्चावरील व्याज :                       ३२,०००.००
२) चालु गुंतवणुकीवरील व्याज :                      ५,०००.००
३) भांडवली साहित्यावरील घसारा :                ३२,०००.००
-------------------------------------------------------------
क] एकूण उत्पादन खर्च १+२+३      :              ९४,०००.००
-------------------------------------------------------------


अ] भांडवली खर्चावरील व्याज आणि घसारा :                    ६६,०००.००
ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                                    ३,३८,६००.००
क] एकूण उत्पादन खर्च १+२+३                                        ९४,०००.००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क   :                                    ४,९८,६००.००  
--------------------------------------------------------------------------------


निष्कर्ष :
१) १० एकरात ६० क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :             ४,९८,६००.००
२) १  एकरात ६  क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :                  ४९,८६०.००
 प्रती क्विंटल कापसाचा किमान उत्पादनखर्च :                             ८३१०.००

टीप :
१) दर चार वर्षांतून एकदा शेतीमध्ये ओला किंवा कोरडा दुष्काळ हमखास पडतच असतो. त्यामुळे उत्पादन खर्च काढताना चार वर्षाचा खर्च तीन वर्षाच्या उत्पादनावर/पीकावर लावणे गरजेचे आहे.  अशा तर्‍हेचा निकष औद्योगीक उत्पादनावर लावला जातच असतो. त्या हिशेबाने प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १०,४००/- रुपयावर जातो.   
२) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, बैलांचा व पीकाचा इंन्शुरन्स धरला तर प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च ११,५००/- रुपयावर जातो.   
३) दुष्काळामुळे, महापुरामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी तसेच माकड, डुक्कर व वन्य श्वापदापासून होणारे नुकसान हिशेबात धरल्यास प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १३०००/- रुपयावर जातो.   
   
              वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.   

उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.   

१) १ शेतकरी व १ बैलजोडी १० एकर कापसाची शेती करु शकतो, असे गृहित धरले आहे.   
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.   
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.   
४) शेण खत, नांगरट, बियाणे, रासायनीक खते, किटकनाशके, सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी खर्च हिशेबात धरला आहे.   
५) शेत जमीनीची किंमत आणि त्या भांडवली गुंतवणुकीवरील व्याज हिशेबात धरलेले नाही. त्यामुळे वडिलोपार्जीत शेतजमीन ज्यांच्याकडे नाही, त्यांनी शेतजमीन खरेदी करून कापसाची शेती करायची म्हटले तर उत्पादन खर्च आणखी वाढेल.   
६) कपाशीच्या दुबारपेरणीचे संकट निर्माण झाल्यास त्यापोटी वाढणारा बियाणाचा खर्च हिशेबात धरलेला नाही.   
७) शेतमजुरीचा दर २००/- रू. धरलेला आहे.   

  
                                                                  -  गंगाधर मुटे   
--------------------------------------------------------------
=========================================   


Nov 14, 2011

अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक

अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                        - गंगाधर मुटे
------------------------------------------------
              लोकमत दिवाळी विशेषांक
              
             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
------------------------------------------------

Nov 12, 2011

शेतकरी संघटक २१ ऑक्टोबर २०११

शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २०११

वर्ष 28 । अंक 15 । 6 नोव्हेंबर 2011



अंतरंग
जागरण
परिशिष्ट 9 हेच भ्रष्टाचाराच्या राजवटीचे उगमस्थान

सुभाष खंडागळे 3 
--------------------------------------------------------------------------
आजकाल
पोशिंद्यांच्या घरावर तुळशीपत्र

ज्ञानेश्वर शेलार 6 
--------------------------------------------------------------------------
विचार
व्यक्तीकेंद्रीत समाज आणि राष्ट्रीयत्व

संजय कोले 8
--------------------------------------------------------------------------
कॉमन नॉन सेन्स
अण्णा आंदोलनाची छोटी जीत मोठी हार

सुधाकर जाधव 11 
--------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्य
स्वच्छ समृद्ध जीवन- उत्तरार्ध

विनय हर्डीकर 13 
--------------------------------------------------------------------------
वाङ्‌मय शेती
सणांचे अनर्थशास्त्र

गंगाधर मुटे 21 
--------------------------------------------------------------------------
मिरचीचे खळे
लागले मिठू मिठू बोलायला

बाबू सोंगाड्या 24 
--------------------------------------------------------------------------
अभिजात वाङ्‌मय
गोदान

मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद, अनु. अनंत उमरीकर 26 
--------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटना वृत्त 30

////////////////////////////////////////////////////////
पीडीएफ अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Nov 9, 2011

कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

कापूस परिषद
* * * * * * * * *

विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११ 
 - गोकुलधाम मैदान * 
- दुपारी १२ वाजता, 
- हिंगणघाट (जि. वर्धा) 
 * * * * * * * * * शेतकरी 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * * हिंगणघाट 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * * लोकमत 
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११ 
* * * * * * * * * kisan 
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. 
* * * * * * * * * baliraja 
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते. 
* * * * * * * * * cotton व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले. 
 * * * * * * * * * देशोन्नती
देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * shetkari
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * * agri
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप
* * * * * * * * * हितवाद
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * कापूस
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * * धान
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * तरुण भारत
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * कापूस व धान उत्पादक परिषद
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * * बळीराजा
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * सकाळ
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * शरद जोशी
दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * * शेतकरी संघटना
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * लोकसत्ता
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * गंगाधर मुटे
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * * हिंगणघाट शेतकर्‍याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * * किसान संघटन
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * * लोकशाही वार्ता
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * रेलरोको सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. * * * * * * * * * रेलरोको सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. * * * * * * * * * रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *



Nov 4, 2011

शाप आदीमायाशक्तीचा......!

शाप आदीमायाशक्तीचा......!

नाकतोंडात नळ्या घुसल्यावर
ती कासावीस झाली
रसायनाचा मार, हवेचा दाब
श्वास गुदमरला.....
प्राण निघायला लागला...
प्राण डोळ्यापर्यंत पोचताच
तिने पापण्या घट्ट मिटल्या
प्राण अडवला, मुठी आवळल्या
तोच तोंडातून शब्द फुटलेत
देवा! ..... वाचव रे देवा!!
दुसर्‍याच क्षणी संचारली तिच्यात
आदी-माया-शक्ती
गर्भाबाहेर आली.... आणि
कडाडली... वीज होऊन....!

"बाबा! का संपवलंत तुम्ही मला
जमिनीवर पाय देण्यापूर्वीच?"
"विवश होतो गं पोरी मी,
मुलगा हवा होताय गं मला..."

"अन् आई तू?
तू तर जगाची जननी आहेस ना?
का घोटलास गं माझा जीव"
" काय सांगू पोरी? अगं माझ्या मताला
इथे विचारतोच कोण?
त्यांनी निर्णय घ्यायचे अन् मी
केवळ निमूटपणे राबवायचेत
याचेच तर नाव समाज आहे गं पोरी...!!"

"समाज! समाज!! समाज!!!
जन्म घेण्यापूर्वीच माझी विल्हेवाट
लावणारा समाज.....
त्या तुमच्या समाजाला आज मी
शाप देतेय....
एक वेळ अशी येईल की
पुरुष स्त्रीसुखाला पारखा होईल
लग्नाला मिळणार नाहीत मुली
बालवधूची प्रथा सुरू होईल
लग्न होऊनही बालवधू
वयात येईपर्यंत
’इंतजार’ करावा लागेल
पुरुषांना....!
गर्भात मुलगी आहे हे कळल्यावर
मागणी नोंदविण्यासाठी कुंकू घेऊन
रांगा लावून बसावे लागेल गर्भासमोर
आणि तरीही.....
प्रश्न सुटणार नाही
पांचाली संस्कृतीचा उदय होईल
मात्र तरीही काही पुरुष जीवांना
जगावे लागेल लग्नाशिवाय
स्त्रीसुखाच्या कमतरतेने ते
अर्धवेडे होतील
त्यांचे जगणे दुष्कर आणि
मरणे मुष्किल होईल
तेव्हा आई
व्याकुळ होईल तुझा हा समाज
एकेका स्त्रीजीवाच्या जन्माची
प्रतीक्षा करत......!!!"

                          - गंगाधर मुटे
----------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं