Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 3, 2015

पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन

पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन

           ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी,हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयचकोडेच आहे.
           गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेलीनाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारणसांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्याअनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणीकरून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला अत्यंत लाजिरवाणीच म्हटलीपाहिजे.

             कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी,मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीआणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आणि साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीवभरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटीबद्ध असणार्‍या लेखक – कवी - गझलकारांनी एकत्र येऊन अ. भा. मराठी शेतकरी साहित्यचळवळ स्थापन केली असून पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ   : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा

-----------------------------------------------------------------
: निमंत्रण पत्रिका :

sahity sanmelan
-----------------------------------------------------------------------
sahity sanmelan



गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!

                                      - गंगाधर मुटे ‘अभय’
---------------------------------------------------------



स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं