Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Oct 30, 2022

शेतकऱ्यांच्या मनातून 'जात' का जात नाही?. Suresh Dwadashiwar प्रा. सुरेश ...


*शेतकऱ्यांच्या मनातून जोपर्यंत 'जात' जात नाही तोपर्यंत.....*

मराठी साहित्यक्षेत्र दरिद्री का राहिले?
शेतकरी आत्महत्या करतात पण कुणाचीच आतडी थरथरत नाही.
शेतकरी संघटना जे सोडून गेलेत त्याचेही कारण जातीतच आढळते.
मराठी साहित्य क्षेत्राने डॉ. आंबेडकर, सरदार पटेल, गांधी, शरद जोशी, मौलाना आझाद यांना कधी समजूनच घेतलं नाही.
कोणत्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची क्षमता शरद जोशी यांच्या साहित्यात आहे.
जेव्हा आपल्या जाती-धर्मापेक्षा आपला शेतकरी नेता छोटा वाटायला लागतो......

प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे अत्यंत परखड प्रतिपादन 

शेतकऱ्यांनी, साहित्यिकांनी, शेतकरी आंदोलकांनी हे भाषण एकदा ऐकलेच पाहिजे.



Oct 27, 2022

ग्लायफोसेट तणनाशक बंदीमागे 'हे' आहे कारण. glyphosate herbicide


ग्लायफोसेट तणनाशक बंदीमागे 'हे' आहे कारण

जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लायफोसेट तणनाशक कुणालाही घातक नसल्याचा हवाला दिला आहे... तरीही भारतात बंदी घालण्यात आली.

Oct 24, 2022

इन्कमटॅक्सची, सीबीआयची, ईडीची धाड पडो!, ईडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे


बिगरशेतकऱ्यांच्या घरात 
इतकी धनलक्ष्मी येवो कि 

इन्कमटॅक्सची 
सीबीआयची 
ईडीची 
धाड पडो!

खोर भरो, कोठा भरो, खोका भरो 
Happy Diwali 

ईडा पिडा टळू दे 
बळीचे राज्य येऊ दे 


Oct 11, 2022

लाल किल्ल्याचा मालक शेतकरीच.. शेतकऱ्यांचे गर्जन गीत Shetkari Garjan Geet


शेतकरी गर्जन गीत
शेतकरी कधी गरजत नाही आणि बरसतही नाही. संबंध शेतीचा इतिहास जरी चाळून बघितला तर १९८० नंतरचा काही काळ सोडला तर शेतकरी गरजताना आढळल्याच्या पाऊलखुणा इतिहासातही आढळत नाहीत.
शेतकरी देशाचा मालक पण निव्वळ नामधारी. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या वाट्याला निव्वळ हलाखीचे आणि लाचारीचे जिणे वाट्यास येत असल्याच्या नियमिततेने इतिहास भरून पावला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत "गोरे जाऊन काळे इंग्रज आले" पण शेतीच्या बांधावर स्वातंत्र्याचा सूर्य कधी पोचलाच नाही.
का पोचला नाही? शेतकरी स्वातंत्र्याचा हकदार नाही का?
असेल तर.....

या देशाचे पालक आम्ही सच्चे कास्तकार रे
लाल किल्याच्या सिंहासनाचे आम्ही बी हकदार रे

अशी डरकाळी शेतकरी का फोडत नसतील?

सादर आहे.... एक शेतकरी गर्जन गीत.
आपण अवश्य ऐका आणि इतरांना ऐकवा....


Oct 2, 2022

म. गांधी-संत एकनाथ महाराजांचा जन्म-मृत्यूचा दृष्टांत - मकरंद अनासपुरे

म. गांधी आणि संत एकनाथ महाराजांचा जन्म-मृत्यूचा दृष्टांत 
विनोदी शैलीत मकरंद अनासपुरे 
फक्त २ मिनिटांचा vdo एकदा बघा, तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल कदाचित.



Sep 25, 2022

बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला


बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैइले, लुगडं घेवून गेला ....॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे

Sep 17, 2022

माजे राणी, माजे मोगा, तुजे दोळ्यांत सोधता ठाव.. कोकणी प्रेमगीत

माजे राणी, माजे मोगा तुजे दोळ्यांत सोधता ठाव प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं. शेतकरी साहित्याच्या मंचावर अशा प्रेमगीतांची आवश्यकताच का? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर तो अगदी रास्त प्रश्न आहे पण.... इथेच तर खरी गंमत आहे. शेतकरी केवळ पैशानेच गरीब (दरिद्री) आहे असे नव्हे तर तो सर्वार्थानेच दरिद्री आहे. पैशाने दरिद्री म्हणून....संपत्तीनेही दरिद्री, साधनानेही दरिद्री, साहित्यानेही दरिद्री आणि संगीतानेही दरिद्रीच. तीन तासाचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर अद्वितीय संगीताने नटलेली सांप्रतकाळातील शेतकरी गीतेचं नाहीत. पैशाची दरिद्री संपली तरी सांस्कृतिक दरिद्री काही लगेच हटत नाही. साहित्यिक-सांस्कृतिक दरिद्री हटवायची असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी शेतकरी पुत्रांनी स्वतःची (इतरांची नव्हे) कंबर कसणे आवश्यक आहे. असो... चला तर दिव्यदृष्टी कलाकारांच्या दिव्य आवाजात ऐकूयात.... एक कोकणी बहारदार प्रीतीचे गीत फुलाफुलांक पुशीत आयलो तुजे माजे प्रीतिचो गाव माजे राजा, माजे मोगा तुजे नावाक जोडता नाव

Sep 16, 2022

प्रथम नमो गणराज गणपती.. ते.. शेतीमालाचा भाव.. शेतकरी गाऱ्हाण्याची दिव्यद...

प्रथम नमो गणराज गणपती.. ते.. शेतीमालाचा भाव.. दशावताराच्या तालातील शेतकरी गाऱ्हाण्याची दिव्यदृष्टी (अंध) कलाकारांची संगीतमय कलाकृती दिव्यदृष्टी कलाकारांना दाद द्यायलाच हवी. दाद देण्यासाठी vdo नक्की बघा आणि शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेही त्यांच्या समोर उभे राहून दाद दिली तरी त्यांना दिसणारच नसते. म्हणून आपण हृदयातून दाद दिली तर ती दाद "या हृदयीचे त्या हृदयी" नक्कीच त्यांच्या हृदयापर्यंत पोचेल. काय बाज, काय साज अन काय आवाज... सगळं कसं एक नंबर ओक्के. संगीत संचालक : बिपीन वर्तक ऑर्गन - महेश नाईक सतार - महेश उमरानिया ऑक्टपॅड - हर्षवर्धन वर्तक बासरी - प्रशांत बानिया गायक - देविदास पालवे तबला - जयेश बानिया गिटार - डोनल्ड कोळी ढोलक - अशोक आर्या गायिका - नवसीन हातोडकर गायिका - संध्या उमरानिया संकल्पना व निर्मिती : ऍड. सतीश बोरुळकर निवेदिका : विद्या बोरुळकर आयोजन - गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ ===== अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी अलिबाग येथील सहाव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.

Sep 15, 2022

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी... दिव्य दृष्टी कलाकारांची दिव्य कलाकृती...

दिव्य दृष्टी कलाकारांची दिव्य कलाकृती काय बाज, काय साज अन काय आवाज... सगळं कसं एकनंबर ओक्के. VDO ची लिंक पहिल्या प्रतिसादात हसत डुलत मोत्याचं पिक येतं गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवीतं माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवीतं संगीत संचालक : बिपीन वर्तक सहभागी कलाकार : महेश उमरानिया, संध्या उमरानिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देविदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक निवेदिका : विद्या बोरुळकर संकल्पना व निर्मिती : सतीश बोरुळकर अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी पैठण येथील पाचव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.

Sep 14, 2022

जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं

जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं - दिव्यांगांनी गायलेले जबरदस्त शेतकरी गीत काय बाज, काय साज अन काय आवाज... सगळं कसं एकनंबर ओक्के. देव ज्याला एखादा अवयव कमी देतो त्याला त्याबदल्यात दुसरे काहीतरी जास्तीचे देतो याचा प्रत्यय देणारी ही कलाकृती. झुंजूमुंजू पहाट झाली, कोंबड्याने बांग दिली पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली भिरभिरती रानीवनी पाखरं जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं संगीत संचालक : बिपीन वर्तक सहभागी कलाकार : महेश उमरानिया, संध्या उमरानिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देविदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक निवेदिका : विद्या बोरुळकर संकल्पना व निर्मिती : सतीश बोरुळकर अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी पैठण येथील पाचव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.

Sep 13, 2022

रे मामा रे मामा रे.... बच्चो का गाना, गावो बच्चो के साथ! Re mama re ma...

बच्चो का गाना, गावो बच्चो के साथ! रे मामा रे मामा रे संगीत जीवनात रुळलं पाहिजे म्हणून जसं गाता येतं तसं गायलं पाहिजे. आपण ऐका आणि आपल्या घरातील बाळगोपाळांना ऐकावा. लहान मुलांमध्ये लहानपणीच संगीताची आवड निर्माण करणे ही वडिलधाऱ्यांची जबाबदारीच आहे. त्यालाच संस्कार म्हणतात व हेच अस्सल संस्कार असतात. नाही तरी पुढील पिढीला देण्यासारखं तुमच्या-आमच्याकडे असतेच काय? निदान संगीत तर देऊयात!

Sep 12, 2022

शेतकऱ्यांची वाघीण राधाबाई कांबळे... खड्या आवाजात सरकारला तलवारीची धाव दा...

शेतकऱ्यांची वाघीण राधाबाई कांबळे... खड्या आवाजात सरकारला तलवारीची धाव दाखवायला सांगणारी शीघ्रकवी Radhabai Kamble

Sep 11, 2022

युगात्मा शरद जोशी यांचा संघटना व साहित्यविषयक दृष्टिकोन Sharad Joshi sa...

युगात्मा शरद जोशी यांचा संघटना व साहित्यविषयक दृष्टिकोन Sharad Joshi sanghatana & Liturature स्वतःच्या शेतकरी संघटनेला निरक्षरांची संघटना संबोधतानाच साहित्यिकांना कानपिचक्या देणारे खुमासदार व परखड शैलीतील युगात्मा शरद जोशी यांचे २०१० मधील भाषण

लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे - गझलगायक - प्रसिद्ध कवी वऱ्हाडी झटकाकार...

रूप सज्जनाचे - गझल लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे - गझल - प्रसिद्ध कवी वऱ्हाडी झटकाकार श्री रमेश ठाकरे यांच्या आवाजात. मी जेव्हा गझल हा काव्यप्रकार हाताळण्यास सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकपणे 'शेती' हाच विषय गझल मध्ये घेऊन आलो. तेव्हा त्यावेळेसचे काही तत्कालीन गझलसम्राट माझ्या गझलेवर तुटून पडलेत. गझल हा "सभ्य" काव्यप्रकार असल्याने गझलेत शेती विषयाला स्थान असू शकत नाही. त्यामुळे माझी गझल ही गझल असल्याचेच त्यांनी नाकारले. माझ्या गझलेवर प्रतिसाद लिहिताना माझ्या गझलेला गझल न म्हणता ''रचना' म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. ... आणि मला 'ती' 'तिचे डोळे. 'तिचे नाक' 'तिचा आकृतिबंध' 'तिची लकब' 'मोगरा' 'पारा' 'गुलाब' वगैरे विषय माझ्या काव्यप्रकारात मला मांडायचेच नव्हते. मी जन्मजात मुजोर असल्याने कुणाच्या दबावात येण्याचे मला काहीच कारण नव्हते. मी वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले. अशातच अध्यात्म्याकडे किंचितशी झुकणारी "रूप सज्जनाचे" ही गझल लिहिली. त्यावरही सोशल मीडियावर वादंग झाला. त्याचे कारणही तेच की गझलेला 'असे' विषय वर्ज्य आहेत. मी जर सुरुवातीच्या काळात घाबरून मागे हटलो असतो तर गझलेत शेती विषय आला असता किंवा नसता, हे देवच जाणे! एका सार्वजनिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकार वऱ्हाडी झटकाकार श्री रमेश ठाकरे यांनी "रूप सज्जनाचे" या गझलेचे गायन केले https://youtu.be/E-XRlBuujZo या लिंकवर क्लिक करून आपण आस्वाद घेऊ शकाल. रूप सज्जनाचे - गझल !!३७॥ लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे भाळास लाव माती, संकेत बंधनाचे का हाकतोस बाबा, उंटावरून मेंढ्या सत्यास मान्यता दे, घे स्पर्श स्पंदनाचे दातास शुभ्र केले, घासून घे मनाला जे दे मनास शुद्धी, घे शोध मंजनाचे आमरण का तनाला भोगात गुंतवावे? सोडून दे असे हे, उन्माद वर्तनाचे अभये चराचराला, संचार मुक्त आहे शत्रूसही निवारा, हे रूप सज्जनाचे - 'गंगाधर मुटे 'अभय' =÷=÷=÷=÷= अकरा/पाच/दोन हजार दहा =÷=÷=÷=÷=

Aug 14, 2022

लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे आम्हीबी हकदार रे




हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||

लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||

शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||

- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
चौदा/आठ/दोन हजार दहा
#शेतकरी-गीत #अभय #गंगाधर-मुटे  #माझी-वाङ्मयशेती

शेतकरी गर्जन गीत
शेतकरी कधी गरजत नाही आणि बरसतही नाही. संबंध शेतीचा इतिहास जरी चाळून बघितला तर १९८० नंतरचा काही काळ सोडला तर शेतकरी गरजताना आढळल्याच्या पाऊलखुणा इतिहासातही आढळत नाहीत.
शेतकरी देशाचा मालक पण निव्वळ नामधारी. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या वाट्याला निव्वळ हलाखीचे आणि लाचारीचे जिणे वाट्यास येत असल्याच्या नियमिततेने इतिहास भरून पावला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत "गोरे जाऊन काळे इंग्रज आले" पण शेतीच्या बांधावर स्वातंत्र्याचा सूर्य कधी पोचलाच नाही.
का पोचला नाही? शेतकरी स्वातंत्र्याचा हकदार नाही का? असेल तर.....
या देशाचे पालक आम्ही सच्चे कास्तकार रे
लाल किल्याच्या सिंहासनाचे आम्ही बी हकदार रे
अशी डरकाळी शेतकरी का फोडत नसतील?
स्वातंत्र्यदिनाच्या मंगल पर्वावर सादर आहे.... एक शेतकरी गर्जन गीत.
आपण ऐका आणि इतरांना ऐकवा....
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं