एहसान कुरेशी - एक सच्चा शेतकरीपुत्र
"मैं कई बार औरंगाबाद आया हूं. मुझे यह शहर अच्छा लगता है. यहां के लोग अच्छे है. दोस्तों इन दिनों में दो चैनल्स के लिए नियमित तौर पर कॉमेडी कर रहा हूं. और उसके अलावा आने वाली फिल्म तुक्का फिट, स्टूडेन्ट और हमार लव स्टोरी में अपने चित परिचित अंदाज में नजर आउंगा. आपको बताऊ, टेलीविजन पर हमेशा कॉमेडी करनेवाला आपका यह दोस्त आज कई मायने में दुखी है. आज मैं आप से अपने मन की बात कहना चाहता हूं. किसान का बेटा हूं और आज किसानों की स्थिति देखकर मुझे तकलीफ होती है. वह कर्ज में जीता है और कर्ज के साथ ही मर रहा है."
ही व्यथा आहे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर शो’मधून दिलखुलास विनोदी शैलीमुळे प्रकाशझोतात आलेले, लोकप्रिय विनोदी कलाकार एहसान कुरेशी यांची. लोकांना खळाळून हसवणारा विनोदाचा हा बादशाह सध्या व्यथित आहे तो शेतकरी करीत असलेल्या आत्महत्यांमुळे. कर्जबाजारी शेतकर्यांच्या गहन समस्यांमुळे व्यथित असलेल्या एहसान कुरेशींनी त्यांच्या व्यथा औरंगाबाद येथून प्रकाशीत होणार्या ‘दिव्य मराठी’ जवळ बोलून दाखविल्या. एहसान कुरेशीं स्वत: भूमिपुत्र आहेत.
शेतकर्यांच्या घरात जन्म घेऊन पुढे नावलौकिक मिळविलेले कलाकार कमी नाहीत. कलेच्या सर्वच क्षेत्रात भरपूर शेतकरी पूत्र आहेत. पण शेतकर्यांचे दुर्दैव असे की, हे सर्व शेतकरीपूत्र गाव सोडून शहरात गेले की यांची शेतीशी असलेली नाळ तुटून जाते. मी शेतकरीपूत्र आहे, असे अभिमानाने सांगताना संकोच वाटायला लागतो. शेतीच्या दुर्दशेचे वास्तव भुलून जातो. शेतीची व्यथा चव्हाट्यावर मांडणे ही तर फ़ार दुरची गोष्ट.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता एहसानभाईचे निवेदन मला फ़ार सुखावून गेले.
एहसानभाई मै आपको दिल-ए-जानसे सॅल्यूट करता हूं!
गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------

0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.