महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?
उठसूठ आणि तो सुद्धा शेतकर्याने न मागताच निष्कारण बाष्कळ सल्ला देण्यासाठी काही लोक फ़ारच उताविळ असतात. सल्ल्यामध्ये तरी काही नाविन्य वगैरे तरी असावे की नाही? गेली ४० वर्ष ऐकत आल्याने आमचे कान बुजण्याची शक्यता तयार झाली आहे शिवाय हे वाक्य पुस्तकात छापू-छापू आजकाल तर प्रिंटींग मशिनला सुद्धा अजिर्ण व्हायची वेळ आली आहे.
हे एक गणित सोडवून दाखवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....
१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर तो निव्वळ शेतीच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर तो निव्वळ रिक्षा चालवून घाम आणि श्रमाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर तो निव्वळ राजकारणाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?
मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते; त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव आम्हाला सांगावा, इतरांचा अनुभव आम्हाला सांगण्याचा कोडगेपणा अजिबात करू नये.
वस्तुत: विद्वत्ता/लायकी/पात्रतेच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे हो भाऊसाहेब......!

तेच तेच घोकमपट्टी केलेले छापील पुस्तकातील छापील उतारे वाचण्याचा आणि आम्हाला ऐकवण्याचा या शहाण्यांना आणि शेतीतज्ज्ञांना ज्या दिवशी कंटाळा येईल किंवा लाज वाटायला लागेल कदाचित त्या दिवसापासून शेतीला बरे दिवस येण्याची सुरवात होऊ शकेल.
शेतीचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव ठरविले जातात, त्यामुळे शेती बकाल अवस्थेकडे झुकली आहे, हे एकतर त्यांच्या गावीच नसतं किंवा ही मंडळी "मंदबुद्धी" असल्याने त्यांच्या आकलनशक्तीला झेपत तरी नसावे.
शेतीची दुर्दशा शेतकर्यांच्या "पात्रतेशी" संबंधित नसून "व्यवस्थेशी" संबंधित आहे, हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी खालील समिकरण सोडवून दाखवावे, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.
हे एक गणित सोडवून दाखवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....
१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर तो निव्वळ शेतीच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर तो निव्वळ रिक्षा चालवून घाम आणि श्रमाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता अन्य व्यवसायात वापरली तर तो दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर तो अगदी लाचलुचपत न घेताही प्रामाणिकपणे दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर तो अगदी लाचलुचपत न घेताही प्रामाणिकपणे दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर तो निव्वळ राजकारणाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?
मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते; त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव आम्हाला सांगावा, इतरांचा अनुभव आम्हाला सांगण्याचा कोडगेपणा अजिबात करू नये.
वस्तुत: विद्वत्ता/लायकी/पात्रतेच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे हो भाऊसाहेब......!
- गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.