शेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ
हे खरे आहे की संपुर्ण भारतवर्षातील शेती तोट्याची हे माझे ठाम मत आहे. पण मला वाटते तेच सर्व खरे आणि बाकी सर्व चुक असे मी मानत नाही. कारण ज्या अंगाने मी शेतीचा विचार केला त्या अंगाने शेती तोट्याची दिसत असेल पण कोणत्याही विषयाला अनेक अंगे असतात, बाजु असतात. कदाचित वेगळ्या अंगाने विचार केल्यास माझी मते चुकीची ठरु शकतात. म्हणुन शेती या विषयाची सांगोपांग चर्चा व्हावी असे मला वाटते.
मग शेती फ़ायद्याची की तोट्याची हे कशाच्या आधारे ठरवायचे? येथे बोलघेवडे पांडित्य उपयोगाचे नाही. लेखन कौशल्य तर अजिबात उपयोगाचे नाही.
येथे कागद आणि पेनच उपयोगाचा.
पिकाचा उत्पादनखर्च आणि त्याला मिळणारे बाजारभाव किंवा शासकिय आधारभुत किमती यांच्या तुलनात्मक आकड्यावरूनच शेती "फ़ायद्याची की तोट्याची" हे ठरू शकते.
आणि सर्व राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ या विषयावर अजिबातच तोंड उघडायला तयार नाही.
एखाद्या उद्योग उत्पादनाचा उत्पादनखर्च काढणे फारच सोपे आहे,कुणालाही काढता येईल कारण त्याची मार्गदर्शक तत्वे, नमुने ठरलेली आहेत.
पण शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा ? हे काम एखाद्या सीएला सुद्धा सहज जमायचे नाही कारण त्याची मार्गदर्शक तत्वे,नमुने ठरलेली नाहीत. एखाद्या सीएने काढला तरी तो निर्दोष असणार नाही.
एकाअर्थाने शेतीविषयक सांगोपांग चर्चा करणे, शेतमालाचा उत्पादनखर्च काढायचा प्रयत्न करने ही ऐतिहासिक गोष्ट आहे कारण हे आजवर फारसे घडलेले नाही.
कृषी विद्यापिठांत एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काय येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत?
कृषी विद्यापिठांत सगळेच विषय असतात पण नेमका शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा हाच विषय का नसतो?
कृषी विद्यापीठे, राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत ही मंडळी निव्वळ शेतकयांना फ़ुकटचे सल्ले देऊन नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती का सुरु करित नाहीत. कृषी विद्यापिठांकडे हजारो एकर जमिन आहे. तेथे ते किति खर्चात किती उत्पन्न घेतात हे जाहीर का करित नाही?
याउप्परही, लोकांना जर हे श्रमकारण व अर्थकारण समजत नसेल, तर या निर्णयप्रक्रियेत भुमिका बजावणार्या व्यक्तिंना, व बाष्कळ बडबड करणार्यांना काही काळापर्यंत एखादे शेत पिकवुन, त्या उत्पन्नाच्या बळावर तिथे जगुन दाखवायला ठेवले पाहिजे.
कृषी विद्यापीठांना हजारो एकर जमिन देवुन त्या शेतीत किमान पाच वर्ष उत्पन्न घेवुन त्या उत्पन्नावर कुलगुरुसहीत सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यांस सांगावे. शासकिय अनुदान बंद करावे. वर्षाशेवटी काय शिल्लक राहाते ते शेतकर्याला स्वानुभवाने दाखवावे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात असे किमान एखादे क्रियाशील विद्यापीठ असणे अत्यंत आवश्यक आहे.
गंगाधर मुटे
.............
नमुन्यादाखाल काही पिकांचे उत्पादन खर्च.
१) जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
२) बागायती कापसाचा उत्पादन खर्च
1 week ago
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.