वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन
शेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.
आज दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान वायगाव चौरस्ता (जि. वर्धा) येथे हजारो शेतकर्यांनी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष माजी आमदार सरोज काशीकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली वायगाव चौरस्त्यावर वाहतुक अडवून १ तास वाहतुक रोखून धरली.
कापसाची सहा हजार रुपये, सोयाबिनची तीन हजार रुपये, तुरीची पाच हजार रुपये आणि धानाची एक हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत जाहीर करावी, थकित वीजबिलापोटी शेतातील विजपुरवठा खंडीत करणे थांबवावे, कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा, बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी, संपूर्ण शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे, आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी इत्यादी प्रश्नाची कायमची सोडवणूक करून घेण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी एक तासाचे लाक्षणिक स्वरुपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.