अच्छे दिन आनेवाले है - १
सारा देश म्हणतो, मोदी आलेत ना! अच्छे दिन आनेवाले है.
.
.
मात्र, अच्छे दिवस कुणाला येतील हे समजून घेण्यासाठी येणार्या पुढील दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. चित्र स्पष्टच आहे.
- कदाचित कांदा आणखी स्वस्त होईल. खाणारा खिदळणार आणि पिकवणारा बोंबलणार.
- आमच्या मायमाऊलीची चूल फ़ुंकायची स्थिती काही बदलणार नाहीये. गॅस वापरणाराला आणखी सबसिडी दिली जाईल पण ...
.
आमच्या मायबहिनी सरपण गोळा करायला, डोईवर मोळी वाहायला आणि शेवटी चूल फ़ुंकायलाच जन्माला आल्या, असाच बुद्धीवाद्यांचा आणि राज्यकर्त्यांचा दृढ समज आहे. आणि यातून सुटका आणि यावर सबसिडी कालही नव्हती ... उद्याही नसणार आहे.
.
आगामी काळात असेच काहिसे चित्र बघायला मिळेल.
आणि ज्यांच्या हाती लेखनी, माईक ते म्हणतील......
अच्छे दिन आनेवाले है.....!
* * * *
विकास म्हणजे नेमके काय हो?
विकास म्हणजे औद्योगीक आणि तत्संबंधी विकासच ना?
कॉंग्रेसवाल्यांनी शेतीतील कच्चा माल लुटून औद्योगीक विकास केला.
नवे सरकार सुद्धा हेच करणार की वेगळे काही करणार?
* * * *
"पुरेशी मजुरी नसणे" आणि "अन्नधान्य स्वस्त असणे" यामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात काम न करण्याची वृत्ती बळावत चालली व शेतीमध्ये मजूर मिळणे कठीण होत चालले. वेठबिगाराप्रमाणे किंवा कमी मोबदल्यात घाम गाळायला तयार न होणे, हे तसे चांगलेच लक्षण मानावे लागेल. ज्या दिवशी शेतकरी शेतीत काम करणे थांबवतील किंवा स्वत:पुरतेच पिकवेल, वरकड पिकवणार नाही, तो दिवस शेतीला सुबत्ता आणण्यासाठीचे पहिले पाऊल पडणारा पहिला दिवस ठरेल. तो दिवस लवकर यावा. (पण तसा दिवस कधिही येण्याची शक्यता नाहीये.)
सर्वांच्या जिभांचे चोचले पूर्ण करण्याची आणि सर्व भुकेल्या पोटांना भरपेट खाऊ घालण्याची जबाबदारी जर शेतकर्यांनी घ्यायची असेल तर शेतकर्यांच्या जीवनात दोन दिवस सुखाचे यावे, अशी सदिच्छा बाळगायला "खाणार्यांच्या" बापाचे काय जाते? निदान त्याच्या कमरेचे धडूते पळवायचे नाही, एवढी "अक्कल" तरी बिगरशेतकरी जनतेला केव्हा येणार?
तीन वर्षापूर्वी कांदा महाग झाला तेव्हा पाकिस्तान मधून कांदा आयात केला होता. तो राहूल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, अडवाणी, मोदी, मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि डावे-उजवे यांनी "सर्वानुमते" गोड मानून खाल्लाच होता ना?
निदान पाकिस्तानचा कांदा पाकनिष्ठ आहे म्हणून त्याला नाकारणारा या देशात एकसुद्धा स्वदेशीप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी "मायचा लाल" जाहिररित्या पुढे का आला नसावा?
शेवटी "शेतकर्यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण" हेच खरे असते ना?
- गंगाधर मुटे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
(तीन वर्षापूर्वीची एक गझल)
* * * *
2 प्रतिसाद:
gzal chan zaliy. pan lekhatle wichar pudhe srknyasathi kay krayla hwe
शेतकर्यांचे संघटन, दबावगट आणि समाज प्रबोधन
हाच उपाय आहे.
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.