एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती
एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सोबतच एबीपी माझाच्या टेलीकास्टींगसाठीच्या एपीसोड शूटींगचा कार्यक्रम मुंबई येथील बोस्टन हाऊस, सुरेन रोड, लँडमार्क बिल्डींगजवळ, दर्पण टॉकीज चौक, अंधेरी पूर्व येथे तारीख २७ जानेवारी २०१३, रविवारला सकाळी ११ ते दुपारी ४.३० च्या दरम्यान पार पडला. सदर कार्यक्रमाचे लवकरच एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारण केले जाईल.
मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी 'ब्लॉग माझा' ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे 'ब्लॉग माझा'! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परिक्षक असणारे दै.'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर विजेते ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं. ते आव्हान निभवतांना परिक्षकांनी काय निकष ठेवलेत, निवड प्रक्रिया कशी किचकट होती याविषयी
परिक्षक पॅनेल मधले एक परिक्षक श्री दिपक पवार ह्यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली. एकंदरीत मजा आली.
१५ विजेत्यांपैकी १२ विजेते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. "ब्लॉग माझा-३" या २०१० मधील स्पर्धेत विजेते ठरल्यापैकी श्री नरेंद्र गोळे, श्री एकनाथ मराठे आणि मी स्वत: या वेळी सलग दुसर्यांदा विजेते ठरलो असल्यामुळे त्यांच्याशी माझा जुना परीचय आणि मैत्री असल्यामुळे त्यांच्याशी संवाद तर झालाच पण यावेळेस नव्यानेच आलेल्यांशीही संवाद साधता आला. आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सोकाजीराव त्रिलोकेकर म्हणजे ब्रिजेश मराठे होय, हे सुद्धा कळून आले. सुलक्षणा लक्ष्मण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. श्रेया महाजन यांचेकडून आणखी बरेचकाही शिकण्यासारखे आहे, याची जाणिव झाली. रोहन जगताप, तन्मय कानिटकर, प्रशांत रोटवदकर आणि इतर विजेत्यांशी संवाद साधण्याची इच्छा वेळेअभावी अपूर्णच राहिली.
एबीपी माझाचे असो-सिनिअर प्रोड्युसर- अँकर, नावाप्रमाणेच सदोदित प्रसन्न भासणारे प्रसन्न

जोशी, यांनी सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आपापल्या ब्लॉगची माहिती सांगण्याची प्रत्येकी २ मिनीटांची ‘बाइट’, अश्या तर्हेने कार्यक्रमाचे शूटींग व रेकोर्डिंग करायचे असल्याची माहिती दिली. कुणी कुठे-कसे उभे राहायचे, कुठून चालायला सुरूवात करायची, प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर कशी "पोझ" घ्यायची, अशा तर्हेच्या जुजबी सुचना देऊन शूटींग व रेकोर्डिंगला सुरूवात झाली.
विनोद कांबळी |
कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला. योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी "शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)" ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
आणि ................ १३ दिवसातच आयुष्यात पहिल्यांदाच अगदी तशीच वेळ माझ्यावर आली. :)
प्रसन्न जोशी सोबत लेखक |
मुंबईपासून माझ्या गावाचे अंतर जवळपास ८०० किलोमीटर. एवढे अंतर चालून कार्यक्रमाला जायचे किंवा नाही असा प्रश्न माझ्यासमोर उद्भवलाच नाही. कार्यक्रमाला जायचेच हा विचार आधीच पक्का झाला होता. त्यामुळे प्रसन्न जोशींची १२ जानेवारी २०१३ रोजी मेल येताच आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम १० फेब्रुवारी २०१३, रविवारला आयोजित केला आहे हे कळताच रेल्वे आरक्षण वगैरे उरकून घेतले. पण एक घोळ झाला. पुन्हा प्रसन्न जोशींची मेल आली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल होऊन १० फेब्रुवारी २०१३ ऐवजी २७ जानेवारी २०१३ ला होणार असल्याचे कळल्याने थोडी तारांबळ उडाली. आता ऐनवेळेवर रेल्वे आरक्षण मिळेल काय, वेटींग मिळाले तर कन्फ़र्म होईल काय, सारे प्रश्नच प्रश्न. शेवटी निर्णय झाला की थेट चारचाकी वाहनानेच जायचे. भटकंती करत जायचे. कोकणात खूप खोलवर घुसायचे, तेथील जीवनशैली न्याहाळत गोवा-रत्नागिरी मार्गे मुंबईला पोचायचे. पण पुरेसा वेळ नसल्याने इष्टमित्र-मंडळींशी आणि आंतरजालीय मित्रांशी फ़ारसा संपर्कच करता आला नाही. त्यामुळे भटकंतीचा उद्देश फ़सला नसला तरी फ़ारसा सफ़लही झाला नाही.
* * * *
चंद्रभागेच्या तिरी - पांडुरंग हरी |
देशी-विदेशी पर्यटकांचा आवडता कोलंगुट बीच, गोवा |
मंगेश मंदीर, गोवा |
* * * *
कोलंगुट समुद्रकिनारा, गोवा |
* * * *
जुने गिरिजाघर, गोवा |
* * * *
दोना पौला, गोवा |
* * * *
किनारपट्टीवरील सुर्यास्त, गोवा |
* * * *
कोकणचा काजू (रत्नागिरी) |
* * * *
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.