पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे : अभाशेसाच-२
नमस्कार मित्रांनो,
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीसाठी 'आपुलकीचे' श्री अभिजित फाळके यांनी 'लोगो' तयार करून द्यायचे मान्य केले आहे. Thanks Abhijeet Arunrao Falke sir!
कालच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे घ्यावे याविषयी चर्चा करुया.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा :
- फेब्रुवारीच्या आधीचा काळ हा कडाक्याच्या थंडीचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीच्या हंगामाचा काळ असतो. आणि फेब्रुवारीच्या नंतरचा काळ शालेय परीक्षांचा असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना अधिक सोईचा ठरेल, असे मला वाटते.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन कुठे घ्यावे :
- याविषयी मात्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. काही पर्याय मी आपल्यासमोर ठेवत आहे. काही पर्याय आपण सुचवावेत.
a १) राज्याची राजकीय राजधानी अर्थात मुंबई.
२) विद्येचे माहेरघर अर्थात पुणे.
३) ग्रामस्वराज्याच्या आणि सुराज्याच्या संकल्पनेचे आणि म. गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम.
४) एखादे मध्यम लोकसंख्येचे खेडेगाव.
आपल्या सुचना इथेच किंवा abmssc@shetkari.in या मेलवर आमंत्रित आहेत.
आपला नम्र
गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------

0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.