www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा
अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या http://www.shetkari.in/ या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा गझलनवाज पं भिमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते, श्री विजय विल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री संजय कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी गझलनवाज भिमराव पांचाळे, श्री विजय विल्हेकर, श्री संजय कोल्हे, श्री गंगाधर मुटे यांची समयोचित भाषणे झालीत.
कार्यक्रमाला गावातील नागरिक उपस्थित होते.
: पहिला शेतकरी गझल मुशायरा :
कार्यक्रमानंतर झालेल्या शेतकरी गझल मुशायर्यात गझलकार चांदूर बाजारचे श्री नितीन देशमुख, नेरपिंगळाईचे श्री लक्ष्मण जेवणे, यवतमाळचे अनिल कोसे, सुदाम सोनुले, विद्यानंद हाडके, गंगाधर मुटे यांनी गझला सादर केल्या.
काही वेचक शेतकरी शेर;
कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला
पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेतामधूनी आला
- श्री नितीन देशमुख
--------------
एकवार गर्भिली उधार पेरणी
फ़ास लावणार ती दुबार पेरणी
- अनिल कोसे
--------------
फ़ाटक्या अंबरा पांघरावे कसे
रान भेगाळले नांगरावे कसे
- सुदाम सोनुले
--------------
आत्महत्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
-------------
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.