न्याय करण्याची सर्वसामान्य लोकांची सामूहिक मानसिकता :
"मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात राहू नका. झुंडशाहीत केवळ सजा दिली जाते, तुम्हाला तुमच्या बचावार्थ बाजू मांडण्याचा अधिकार नसतो. "मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात यासाठी सुद्धा राहू नका कारण तुम्ही गुन्हा केला किंवा नाही हे झुंड ठरवेल.
तुमच्या मरण्यावर २५ लोकांच्या झुंडीने जल्लोष केला तर तो जल्लोष बघून हजारो-लाखो-करोडो लोकं जल्लोष करायला एका पायावरच तयार असतात. याचेही भान असू द्या!
असो. तूर्त इतकेच पुरेसे.
- गंगाधर मुटे
- पायदळ चालणारा व सायकल यांची टक्कर झाली तर पायदळ चालणारा निर्दोष व सायकल चालक गुन्हेगार
- सायकल व बाईक यांची टक्कर झाली तर सायकल चालक निर्दोष व बाईक चालक गुन्हेगार
- बाईक व कार यांची टक्कर झाली तर बाईक चालक निर्दोष व कार चालक गुन्हेगार
- कार व ट्रॅव्हल्सची टक्कर झाली तर कार चालक निर्दोष व ट्रॅव्हल्स चालक गुन्हेगार
- निर्दोष कोण आणि गुन्हेगार कोण याचा न्यायनिवाडा करायला त्यांना १ मिनिट देखील लागत नाही. काही सेकंद पुरेसे असतात.
- न्यायनिवाडा करायला घटनास्थळाचे निरीक्षण करण्याची त्यांना गरज नसते. ऐकीव माहितीच पुरेशी असते.
- न्यायनिवाडा करायला कायद्याऐवजी त्यांची भावनाच पुरेशी असते.
- सर्वसामान्य लोकांना ज्याची दया येते त्याच्या बाजूने न्याय झुकतो.
- जो न्याय करायला एक मिनिट देखील लागत नाही तोच न्याय करायला न्यायव्यवस्था काही महिने/वर्ष लावतात, हे त्यांच्या असंतोषाचे कारण असते.
"मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात राहू नका. झुंडशाहीत केवळ सजा दिली जाते, तुम्हाला तुमच्या बचावार्थ बाजू मांडण्याचा अधिकार नसतो. "मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात यासाठी सुद्धा राहू नका कारण तुम्ही गुन्हा केला किंवा नाही हे झुंड ठरवेल.
तुमच्या मरण्यावर २५ लोकांच्या झुंडीने जल्लोष केला तर तो जल्लोष बघून हजारो-लाखो-करोडो लोकं जल्लोष करायला एका पायावरच तयार असतात. याचेही भान असू द्या!
असो. तूर्त इतकेच पुरेसे.
- गंगाधर मुटे
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.