’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे
अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि आशयगर्भ गझलांनी ’माझी गझल निराळी’ हा संग्रह दखलपात्र बनला आहे. ग्रामिणतेचे अस्तर फ़ार सुरेख आहे.
“वांगे अमर रहे” हा चिंतनशील आणि कृषी-ग्राम निर्भर लोकसांस्कृतिक लेखांचा संग्रहसुद्धा अतिशय आवडला. या संग्रहातील अनेक लेखामागेतुमच्या व्यथावेदनांची संवेदनशीलता आहे.
’भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी – महिलंच्या व्यथा’ आणि ’भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन’ हे लेख अतिशय आवडले.
’गझल : सुरेश भटानंतर’ या संग्रहात तुमच्या तीन गझलांचा समावेश हा तुमच्या प्रतिभेचा सन्मान आहे. आपले हार्दिक अभिनंदन!
- डॉ. मधुकर वाकोडे
अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.