मनाला थेट भिडणारी गझल
“माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा, उत्तम बांधणी, मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह नक्कीच निराळा वाटतो. आपल्या गझलचा मीपण एक फॅन आहे. लगेच वाचून ही टाकला... आजवर मायबोली व फेसबूक-वर आबांकडून नेहमीच तुमच्या गझल व त्याविषयी वाचत होतो. या गझल संग्रहातही नेहमीसारखीच मनाला थेट भिडणारी गझल वाचून आनंद वाटला. मला आपली गझल का आवडते हे आबांना सांगताना मी म्हटले की "त्यांची गझल ही कल्पनेच्या विश्वात भरकटण्यापेक्षा वास्तव जगण्याचा जो ठाव घेते त्यामुळे ती जास्त भावते. काल जेव्हा मी गझल वाचत होतो तेव्हा हातात पेन्सिल होती आणि आवडत्या शेरांवर टिकमार्क करत होतो पण बघता बघता सगळ्या पुस्तकावरच टिकमार्क झालेत.....
काका, सामान्य कष्टकरी, शेतकरी हा मला जगातला सगळ्यात मोठा सृजक वाटतो. आपल्या रक्तात ती सृजन शिलता आहे. आणि तीच गझलेत उतरली आहे म्हणून गझल जीवंत वाटते. जब गझल का इतिहास लिखा जायेगा...... तेव्हा गझल कल्पनेच्या कोषातून बाहेर काढण्यात आपल्यासारख्या गझलकाराचे योगदान फ़ार मोठे आहे, याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. खरं तर मी आत्ताच गझल प्रकाराशी परिचित होतो आहे. त्यामुळे माझं रसग्रहण कदाचित बालिश वाटेलही परंतु आपल्या गझला मला मनापासून आवडल्यात इतकंच!
तुषार देसले
तुषार देसले
झोडगा (माळेगाव)
== ० == ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.