’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर
प्रमोद गुळवेलकर
स्टेट बॅंक ऑफ़ हैदराबाद
शहाजंग शाखा, औरंगाबाद
दि : ०२-०२-२०१४
प्रिय श्री गंगाधर मुटे ’अभय’
यांस स. नमस्कार
आपली दोन्ही पुस्तके दोन दिवसात वाचून काढली. समाधान वाटले.
गझल संग्रहातील "दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे, कुठे लुप्त झाले फ़ुले-भीम-बापू, ते शिंकले तरीही" या गझल खूप उत्तम झाल्या आहेत. कवीचे तरल संवेदनाक्षम मनाचे प्रतिबिंब या रचनांतून उमटले आहे. "माझी ललाट रेषा, मजला फ़ितूर झाली’ ही एक अप्रतिम गझल.
पुन:पुन्हा ही गझल वाचतांना कै. सुरेश भटांचा वसा चालवणारा कुणी एक भेटल्याचा आनंद वाटला. तुम्ही भटांची नक्कल करता, असे नव्हे पण त्यांच्या रचना वाचतांना येणार्या तरल अनुभूती, मोजक्या शब्दयोजनेतून मिळणारी चपखल अभिव्यक्ती आणि जगावेगळी फ़किरीवृती तुमच्या साहित्यकृतीत सम्यकपणे आढळतात.

तुमचा हात असाच लिहीता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून हा लेखनप्रपंच थांबवतो.
अमर वांग्याविषयी नंतर लिहीन. औरंगाबादला कधी येणं केलंत तर भेटीमुळे स्नेह वृद्धिंगत होईल.
आपला
प्रमोद गुळवेलकर
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.